नमस्कार मित्रांनो जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन डेटा बूस्टर प्लान्स लॉन्च केले आहेत, ज्यांची किंमत ₹51 आणि ₹101 आहे. हे प्लान्स त्यांच्यासाठी उपयुक्त आहेत, ज्यांचा दररोजचा डेटा लिमिट संपला आहे आणि अधिक डाटाची आवश्यकता आहे.
₹51 च्या डेटा बूस्टर प्लानमध्ये जिओ ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा सोबत 3GB 4G डेटा दिला जातो. हा प्लान विशेषता त्या ग्राहकांसाठी आहे, ज्यांनी 1.5GB प्रति दिवस डेटा असलेला प्लान रिचार्ज केला आहे आणि त्यांना अतिरिक्त 5G डेटाची गरज आहे. या प्लानची वैधता सध्या चालू असलेल्या प्लानच्या वैधतेइतकीच राहील.
₹101 च्या डेटा बूस्टर प्लानमध्ये ग्राहकांना 6GB 4G डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटा मिळतो. हा प्लान त्या ग्राहकांसाठी उपयुक्त आहे, ज्यांचा 1.5GB प्रति दिवस किंवा 1GB प्रति दिवस डेटा प्लान चालू आहे आणि जास्त डाटाची आवश्यकता आहे. या प्लानची वैधता देखील सध्याच्या सक्रिय प्लानच्या वैधतेइतकीच असेल.
हे दोन्ही प्लान्स जिओ ग्राहकांना त्यांचा इंटरनेटचा अनुभव सुधारण्यासाठी आणि अधिक डेटा वापरासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात.