नमस्कार आपल्या देशातील अनेक नागरिकांकडे रेशन कार्ड उपलब्ध आहेत. ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका आहे, त्यांनाच शासनाकडून रेशन धान्य दिले जाते. तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि अद्याप तुम्ही तुमच्या रेशन कार्डसह मोबाईल क्रमांक लिंक केलेला नसेल, किंवा नवीन मोबाईल नंबर घेतला असेल, तर तो अपडेट कसा करायचा हे आपण या लेखात पाहणार आहोत.
रेशन कार्डला मोबाईल क्रमांक लिंक कसा करावा?
जर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक बदललेला असेल आणि नवीन क्रमांक रेशन कार्डसह अपडेट करायचा असेल, तर हे तुम्ही सहजपणे करू शकता. रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या खालील स्टेप्सचा अवलंब करून मोबाईल क्रमांक लिंक करू शकता.
रेशन कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी आवश्यक गोष्टी
- NFS ID (नॅशनल फूड सिक्युरिटी आयडी)
- आधार क्रमांक
- मोबाईल क्रमांक
- 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक
ऑनलाईन मोबाईल क्रमांक कसा अपडेट करावा?
- सर्वप्रथम नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईटवर Citizen’s Corner या नावाचा सेक्शन दिसेल, त्याठिकाणी ‘Register/Change of Mobile No या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.
- या पेजवर कुटुंबातील मुख्य सदस्यांचा NFS आयडी किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
- तुमचा 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक प्रविष्ट करा.
- रेशन कार्डवर घरातील ज्या मुख्य सदस्याचे नाव आहे, तेच नाव प्रविष्ट करा.
- नंतर, तुमचा नवीन मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून Save या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) प्रविष्ट केल्यानंतर तुमचा नवीन मोबाईल क्रमांक रेशन कार्डसह लिंक होईल.
ऑफलाईन मोबाईल क्रमांक कसा अपडेट करावा?
जर ऑनलाईन अपडेट करताना काही अडचण येत असेल, तर तुम्ही ऑफलाईन अर्ज करून सुद्धा मोबाईल क्रमांक अपडेट करू शकता. यासाठी फूड डिपार्टमेंटमध्ये (तहसील कार्यालयातील अन्न व नागरी पुरवठा विभागात) जाऊन अर्ज सादर करावा लागेल. अर्जासोबत रेशन कार्ड आणि आधार कार्डच्या प्रती देखील द्याव्या लागतील. अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसांत तुमचा नवीन मोबाईल क्रमांक रेशन कार्डसोबत अपडेट होईल.
वरील पद्धती वापरून तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक रेशन कार्डमध्ये सहजपणे अपडेट करू शकता आणि रेशन सुविधांचा लाभ घेत राहू शकता.