नमस्कार सरकारने रेशन कार्डसंबंधी काही नियमांत बदल केले आहेत, जे १ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. या नवीन नियमानुसार, तांदूळ व गहू यांच्या वाटपात बदल करण्यात आला आहे. जाणून घेऊ या, काय आहेत हे बदल आणि त्याचा नागरिकांवर काय परिणाम होणार आहे.
सरकारच्या योजनांचा लाभ
भारत सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, ज्याचा लाभ कोट्यवधी नागरिकांना मिळतो. विशेषता देशातील गोरगरीब लोकांसाठी स्वस्त दरात धान्य पुरवले जाते. स्वस्त धान्य दुकानांमधून साखर, तेल, तांदूळ आणि गहू या वस्तूंचे वाटप केले जाते. कोरोना काळातही सरकारने अतिरिक्त धान्य वितरण मंजूर केले होते. आता या धान्य वाटपात काही बदल करण्यात आले आहेत.
१ नोव्हेंबरपासून बदल लागू
१ नोव्हेंबरपासून नवीन नियमानुसार रेशन कार्डधारकांना तांदूळ आणि गहू समान प्रमाणात वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच्या नियमानुसार, कार्डधारकांना ३ किलो तांदूळ व २ किलो गहू दिले जात होते. नवीन नियमांनुसार, आता २.५ किलो तांदूळ आणि २.५ किलो गहू या प्रमाणात धान्य वितरित केले जाईल.
अंत्योदय कार्डधारकांसाठी बदल
अंत्योदय कार्डधारकांसाठी दिल्या जाणाऱ्या ३५ किलो खाद्यान्न वितरणातही बदल करण्यात आला आहे. आधी ३० किलो तांदूळ व १४ किलो गहू मिळत असे आता हे प्रमाण बदलून १८ किलो तांदूळ आणि १७ किलो गहू असेल.
ई-केवायसीची मुदतवाढ
केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांना ई-केवायसी पूर्ण करण्याची सूचना दिली होती, ज्याची अंतिम तारीख १ सप्टेंबर होती. परंतु अनेक अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही, म्हणून आता ही मुदत वाढवून ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. तरीसुद्धा दिलेल्या तारखेपर्यंत ई-केवायसी न झाल्यास, संबंधित रेशन कार्ड रद्द होऊ शकते.
या बदलांचा मुख्य उद्देश धान्य वितरणाच्या प्रक्रियेत सुधारणा करणे व गरजूंना योग्य प्रमाणात अन्नधान्य पोहोचवणे आहे.