मंडळी केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी बोगस लाभार्थींना हटवण्यासाठी रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी सुरुवातीला 30 जून अखेरची तारीख निश्चित करण्यात आली होती, परंतु आता सरकारने ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. यासंदर्भात अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने आधिकारिक सूचना जारी केल्या आहेत.
मुलगी असेल तर मिळेल २० हजार रुपये, असा करा अर्ज
वन नेशन, वन रेशन कार्ड योजना
देशातील गरजू नागरिकांना योजनेचा फायदा मिळावा, यासाठी केंद्र सरकारने वन नेशन, वन रेशन कार्ड योजना लागू केली आहे. यामुळे रेशन कार्ड धारकांना त्यांच्या आधार कार्डाशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. योजनेचे प्रमुख उद्दिष्ट असे आहे की, मृत व्यक्तींच्या नावावर मिळणारे रेशन थांबवून ते योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवता येईल.
आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल ७ रुपये प्रती लिटर अनुदान
बोगस शिधापत्रिकांवर नियंत्रण
देशभरात अनेक नागरिकांकडे एकापेक्षा जास्त शिधापत्रिका आहेत, आणि ते विविध ठिकाणांहून रेशन घेत आहेत. याशिवाय कुटुंबातील मृत व्यक्तींच्या नावावरही रेशन घेतले जात आहे. या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने रेशन कार्ड धारकांना त्यांची शिधापत्रिका आधार कार्डाशी लिंक करण्याची सक्ती केली आहे. जे लोक आपली शिधापत्रिका आधारशी लिंक करणार नाहीत, त्यांचे रेशन 30 सप्टेंबरनंतर बंद केले जाईल.
ऑक्टोबरपासून या नागरिकांना मिळेल मोफत गॅस सिलिंडर, पहा कोण आहे लाभार्थी
रेशन कार्ड आणि आधार लिंक करण्याची प्रक्रिया
रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी तुम्ही तुमच्या नजीकच्या रेशन दुकानात जाऊ शकता. तसेच तुम्ही ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेही पूर्ण करू शकता. लिंक करण्यासाठी खालील प्रमाणे प्रोसेस फॉलो करा
1) सरकारी पोर्टलवर लॉग इन करून आवश्यक माहिती भरा.
2) रेशन कार्ड आणि आधार कार्डची प्रत रेशन दुकानात सादर करा आणि लिंकिंग प्रक्रियेसाठी मदत घ्या.
मित्रांनो जर तुम्ही अद्याप रेशन आणि आधार लिंक केले नसेल, तर ही प्रक्रिया 30 सप्टेंबरच्या आत पूर्ण करा, अन्यथा तुमचे रेशन कार्ड निष्क्रिय होऊ शकते.