मित्रांनो आपण रेशनवर मिळणारं स्वस्त धान्य घेत असाल आणि अजूनही रेशन कार्डचं ई-केवायसी (e-KYC) केलं नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाने ठोस निर्णय घेतला आहे – 1 मे 2025 पासून ई-केवायसी नसलेल्या कार्डधारकांना रेशन मिळणार नाही.
का केलं जातंय ई-केवायसी?
राज्यभरात कोट्यवधी लोक रेशनवर अवलंबून आहेत. पण काही ठिकाणी डुप्लिकेट कार्ड किंवा अपात्र लाभार्थी स्वस्त धान्याचा गैरवापर करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सरकारने प्रत्येक लाभार्थ्याची खरी ओळख सुनिश्चित करण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक केली आहे.
यासाठी 30 एप्रिल 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. पण अद्यापही अनेकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आता थेट निर्णय – केवायसी नसेल, तर रेशन नाही.
ई-केवायसी म्हणजे काय?
ई-केवायसी (Electronic Know Your Customer) ही आधार कार्डाशी जोडलेली डिजिटल ओळख तपासणी प्रक्रिया आहे. यात तुमचं फिंगरप्रिंट किंवा चेहरा (Face Recognition) स्कॅन करून, रेशन कार्डवरील माहिती खरी आहे की नाही, हे पडताळलं जातं.
ई-केवायसी करण्याचे दोन सोपे मार्ग
1) ऑफलाइन पद्धत
- जवळच्या रेशन दुकानावर (FPS) जा.
- तुमचं रेशन कार्ड आणि आधार कार्ड नंबर द्या.
- स्थानिक पुरवठादार बायोमेट्रिक यंत्राद्वारे तुमची ओळख पडताळेल. 2) ऑनलाइन पद्धत (घरबसल्या)
- Aadhaar FaceRD अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करा.
- पत्ता व आधार क्रमांक भरा.
- OTP टाका.
- Face-e-KYC पर्याय निवडा व चेहरा स्कॅन करून अपलोड करा. ई-केवायसी न केल्यास काय होईल?
जर 1 मे 2025 पूर्वी ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर तुमचं रेशन कार्ड तात्पुरते निष्क्रिय केलं जाईल. याचा थेट परिणाम म्हणजे – स्वस्त धान्य मिळणार नाही.
जर तुमचं किंवा तुमच्या ओळखीचं कोणाचंही ई-केवायसी शिल्लक असेल, तर आजच पूर्ण करा. थोडा वेळ खर्च करा – पण पुढचे काही महिने दिलासा मिळेल. हे काम आजच करून टाका, उशीर झाला तर तुमचं रेशन थांबेल.
तुमचं रेशन वाचवायचंय? तर ई-केवायसी आजच करा.