अशा काही योजना आहे, त्या योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. यासाठी सरकारने नियम तयार केलेले आहे. जर तुमचे उत्पन्न इतक्या हजारापेक्षा किंवा लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला काही योजनांचा लाभ घेता येणार नाही. असे सरकारचे नियम असतात.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार अल्पउत्पन्न तसेच गरजू घटकांना रेशनिंग कार्ड उपलब्ध करून दिले जाते. त्याद्वारे या वर्गाला अन्नधान्य मोफत वितरित केले जाते. हे कार्ड काढण्यासाठी काही नियम आखलेले आहेत. १०० चौरस मीटरपेक्षा अधिक जमीन, प्लॉट, घर मालकीचे असेल यासाठी अर्ज करता येत नाही.
घरात फ्रीज, एसी, चारचाकी गाडी असेल तरी अर्ज करता येत नाही. सरकारी नोकरीत असलेल्यांना यासाठी अर्ज करता येत नाही. वार्षिक उत्पन्न शहरी विभागात ३ लाखापेक्षा व ग्रामीण भागात २ लाखांपेक्षा अधिक असल्यास अर्ज करता येत नाही.
तसेच यांना जेलची हवा सुद्धा खायला मिळू शकते. गरीब कुटुंबाना सरकारी योजनेचा लाभ मिळावा यासाठी वेळोवेळी खंबीर पाऊले उचलत असतात, पण काही लोक असे असतात का ते छान कमाऊ असूनसुद्धा योजनेच्या लाभासाठी तडफडत असतात.