मित्रानो आपण या लेखामध्ये घरबसल्या नवीन रेशनकार्डासाठी (Ration Card) ऑनलाइन अर्ज कसा करावा याची सुस्पष्ट आणि सोपी माहिती पाहणार आहोत. रेशनकार्ड समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वपूर्ण असते, कारण ते सरकारी योजना आणि सेवांसाठी आवश्यक ठरते. यावेळी, नवीन रेशनकार्डसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करणे सहज शक्य आहे, ज्यामुळे आपला वेळ वाचेल आणि अडचणी टाळता येतील.
नवीन रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
नवीन रेशनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.
1)
सर्वप्रथम अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची अधिकृत वेबसाईट उघडा.
https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx
2) वेबसाईट उघडल्यानंतर ऑनलाईन सेवा या विभागात ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या लिंकवर क्लिक करा.
3) ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली लिंकवर क्लिक केल्यावर RCMS पोर्टल उघडेल. येथे Sign In/Register या पर्यायावर Public Login निवडा.
4) नवीन रेशनकार्डसाठी नोंदणी करण्यासाठी नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करा.
5) No Ration Card पर्यायावर क्लिक करा आणि आधार कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख, लिंग, व इतर आवश्यक माहिती भरा. आधार OTP व्हेरिफाय करा.
6) आधार व्हेरिफिकेशननंतर, यूजरनेम आणि पासवर्ड सेट करा. त्यानंतर राज्य, जिल्हा, गाव, पत्ता, आणि शिधापत्रिकेसाठी अर्ज करा.
7) अर्ज सादर केल्यानंतर, तहसील कार्यालयात जाऊन ओळखीचे, पत्त्याचे, वयाचे, उत्पन्नाचे पुरावे आणि कुटुंबप्रमुखाचा फोटो यासारखी आवश्यक कागदपत्रे जमा करा.
8) सादर केल्यानंतर त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी Public Login मध्ये लॉगिन करा आणि अर्जाची सद्य स्थिती पहा.
महत्त्वाची सूचना
- जर कुटुंबामध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची महिला सदस्य नसेल, तर कुटुंब प्रमुख (पुरुष सदस्य) रेशनकार्ड साठी अर्ज करू शकतात.
या पद्धतीने आपल्याला घरबसल्या सोप्या आणि जलद पद्धतीने नवीन रेशनकार्ड मिळवता येईल.