पीकविमा भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया आता सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना PMFBY (प्रधानमंत्री फसल बीमा योजना) च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा सीएससी (कॉमन सर्विस सेंटर) आणि फार्मर कॉर्नर या माध्यमांद्वारे अर्ज करण्याची सुविधा मिळाली आहे. याशिवाय मोबाईलवरून देखील पीकविमा भरता येईल. चला, मोबाईलवरून पीकविमा कसा भरावा ते पाहूया.
पीकविमा मोबाईलवरून कसा भरावा?
1) सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या मोबाईलवर PMFBY Crop Insurance अँप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central
2) अँप डाऊनलोड केल्यानंतर, तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यावर आलेल्या OTP द्वारे तुम्ही लॉग इन करू शकता.
3) लॉग इन केल्यानंतर, PMFBY Insurance पर्यायावर क्लिक करा. नंतर, राज्य, हंगाम, योजनेचे नाव, आणि योजनेचे वर्ष निवडा.
3) वरील सर्व पर्याय भरल्यानंतर, सेव्ह आणि सबमिट या बटणावर क्लिक करा.
5) यानंतर, बँक डिटेल्स (बँक नाव, खाते क्रमांक) नीट भरावे लागतील.
6) शेतकऱ्यांची माहिती आधार कार्ड प्रमाणे भरावयाची आहे. यामध्ये नाव, पत्ता आणि आधार नंबर दिला पाहिजे.
7) पुढील पाऊल म्हणजे जिल्हा, तालुका, तहसील, आणि गाव याची माहिती भरावी लागेल.
8) पिकाची माहिती जसे की पिकाचे नाव, लागवड तारीख, सर्व्हे नंबर, खाते नंबर आणि मालकी हक्क भरावी लागेल.
9) जर तुम्ही यापूर्वी पीकविमा भरला असेल, तर त्या आधीची माहिती दिसेल. तुम्ही ती माहिती तपासून पाहू शकता. यानंतर, आधारकार्ड, सातबारा, बँक पासबुक आणि पीक पेरा प्रमाणपत्र ही कागदपत्रे अपलोड करा.
10) सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करण्याचा पर्याय मिळेल. पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला अर्जाची पावती मिळेल, जी तुम्ही डाऊनलोड करू शकता.
घरबसल्या मोबाईलवरून पीकविमा भरण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि सोयीस्कर आहे. शेतकऱ्यांना कागदपत्रे आणि इतर प्रक्रिया पार पडल्यावर यामुळे मोठा फायदा होईल.