शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण दिले जाते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, हवामानातील बदल आणि विविध घटकांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळते. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरलेली आहे.
प्रधानमंत्री पिकविमा योजनेची वैशिष्ट्ये
या योजनेअंतर्गत पिकाची पेरणी न झाल्यास, दुष्काळ, वीज पडणे, गारपीट, किडी व रोगांचा प्रादुर्भाव, चक्रीवादळ, नैसर्गिक आग यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण दिले जाते.
विमा क्लेम करण्याची प्रक्रिया
1) जर तुम्ही प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत विमा घेतला असेल, तर पिकांचे नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत विमा कंपनीला क्लेम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावा लागेल.
2) पिक नुकसानीबाबत माहिती देण्यासाठी Crop Insurance या मोबाईल अॅपचा वापर करावा.
Crop Insurance अॅपद्वारे क्लेम करण्याची पद्धत
1) सर्वप्रथम Google Play Store वर जाऊन Crop Insurance अॅप डाउनलोड करा.
2) अॅप उघडल्यानंतर भाषा निवडा आणि खात्याशिवाय काम सुरु ठेवा या पर्यायावर क्लिक करा.
3) त्यानंतर पिक नुकसानीची पुर्व सूचना या पर्यायावर क्लिक करा.
4) मोबाइल नंबरद्वारे ओटीपी प्रमाणित करा.
5) खरीप किंवा रब्बी हंगाम निवडा, वर्ष निवडा आणि प्रधानमंत्री पिकविमा योजना निवडून पुढे जा.
6) पिकाच्या नुकसानीच्या घटनेचा प्रकार, पिक वाढीचा टप्पा, नुकसानीची टक्केवारी, आणि फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करा.
7) सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा. तुमचा क्लेम यशस्वीपणे सबमिट होईल. तुम्हाला एक डोकेट आयडी मिळेल, ज्याच्या आधारे क्लेमची स्थिति तपासता येईल.
शेतकरी मित्रांनो याप्रकारे 72 तासांच्या आत विमा कंपनीला पिक नुकसानीची माहिती कळवल्यास तुम्हाला विमा क्लेमची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल.