मंडळी भारतात सुरक्षित गुंतवणुकीला नेहमीच प्राधान्य दिलं जातं, आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये अनेक लोक आपला पैसा गुंतवतात. जर आपल्याला देखील पोस्ट ऑफिसच्या एखाद्या योजनेंत गुंतवणूक करण्याची इच्छा असेल, तर आजची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
आज आपण पोस्ट ऑफिसच्या एक अत्यंत लोकप्रिय बचत योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना महिन्याला 9000 रुपये मिळू शकतात. या योजनेचे नाव आहे पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम. अनेक गुंतवणूकदारांनी या योजनेत आपला पैसा गुंतवलेला आहे आणि त्यांना चांगला परतावा मिळालाय. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे.
योजना आणि गुंतवणूक मर्यादा
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम मध्ये किमान 1000 रुपये गुंतवता येतात. यामध्ये सिंगल अकाउंट आणि जॉइंट अकाउंट दोन्ही प्रकार ओपन करता येतात. सिंगल अकाउंटमध्ये कमाल 9 लाख रुपये गुंतवता येतात, तर जॉइंट अकाउंटमध्ये हे प्रमाण 15 लाख रुपये आहे. ही योजना पाच वर्षांसाठी आहे, आणि सध्या या योजनेत 7.4% दराने व्याज मिळत आहे.
अल्पवयीनांसाठी गुंतवणूक
अल्पवयीन बालकांसाठी देखील ही योजना खुली आहे, परंतु त्यांच्या नावावर गुंतवणूक करतांना पालकांनी अकाउंट ओपन करावे लागते.
पैसे काढण्याबाबत सूचना
ही योजना लॉक-इन पीरियडसह आहे. याचा अर्थ, एक वर्षाच्या कालावधीपर्यंत पैशांची काढणी करता येत नाही. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पैसे काढले तरी काही नियम आहेत. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 ते 3 वर्षांमध्ये पैसे काढले, तर त्याला त्याच्या गुंतवणुकीच्या 2% रक्कमेचा दंड भरावा लागेल. 3 वर्षांनंतर पैसे काढल्यास, 1% रक्कम दंड म्हणून भरावी लागते.
9000 रुपये मिळवण्यासाठी आवश्यक गुंतवणूक
जर तुम्हाला पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममधून महिन्याला 9000 रुपये मिळवायचे असतील, तर तुम्हाला जॉइंट अकाउंट ओपन करावे लागेल आणि यामध्ये कमाल 15 लाख रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये 15 लाख रुपये गुंतविल्यास, तुम्हाला 9250 रुपये दरमहा मिळतील. जर तुम्ही सिंगल अकाउंट ओपन करून 9 लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला 5550 रुपये महिन्याला मिळतील.
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम ही एक सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना निश्चित परतावा मिळतो. गुंतवणूक करताना योजनेच्या अटी आणि नियमांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.