मंडळी पोस्ट ऑफिसने ग्राहकांसाठी एक नवी सुरक्षित आणि फायदेशीर योजना सुरू केली आहे. या योजनेत तुम्ही पाच हजार रुपये दरमहा गुंतवून 10 वर्षांनंतर 8 लाखांहून अधिक परतावा मिळवू शकता. चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
पोस्ट ऑफिस रिपेअरींग डिपॉझिट योजना 2024 ही योजना तुमच्यासाठी भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. या योजनेचा मुदतकाल 5 वर्षांचा असून, तो पुढे वाढवण्याचीही सुविधा दिली जाते. तुम्ही कमीत कमी 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.
या योजनेत 6.7 टक्के वार्षिक व्याजदर लागू असून चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. जर तुम्ही दरमहा 5,000 रुपये गुंतवले, तर 10 वर्षांनी तुम्हाला 8.54 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळतो. जर तुम्ही 10,000 रुपये गुंतवले, तर परतावा 16 लाखांपर्यंत जाऊ शकतो.
ही योजना वैयक्तिक (सिंगल) तसेच संयुक्त (जॉईंट) स्वरूपात उघडता येते. जर दर महिन्याला पैसे भरले नाहीत, तर शंभर रुपयांमागे 1 रुपया दंड आकारला जातो.
ही योजना सरकारी असल्यामुळे गुंतवणुकीची संपूर्ण सुरक्षितता मिळते. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या आणि योजनेचा लाभ घ्या.
तुमच्या भविष्याच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आणि विश्वासार्ह आहे.