नमस्कार प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) ही एक महत्वाची मातृत्व लाभ योजना आहे. या योजनेचे उद्दिष्ट गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना आर्थिक मदत करून त्यांच्या आरोग्याचा स्तर सुधारणे व कुपोषण कमी करणे आहे. पहिल्या जिवंत बाळाच्या जन्मासाठी सरकारकडून या योजनेअंतर्गत महिलांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जी थेट बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्यात तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.
योजनेची उद्दिष्टे
1) गर्भवती आणि स्तनदा महिलांना मजुरी कमी झाल्याबद्दल आर्थिक मदत देऊन त्यांना योग्य विश्रांती व पोषण मिळवून देणे.
2) कुपोषणाचा प्रभाव कमी करणे आणि महिलांचे आरोग्य सुधारणे.
3) संस्थात्मक प्रसूतीस प्रोत्साहन देणे.
योजनेच्या मुख्य वैशिष्ट्य
- कोणत्याही उत्पन्न गटातील गर्भवती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- निधीचा लाभ घेण्यासाठी आधार आधारित पेमेंट आवश्यक आहे.
- अर्जाची स्थिती आणि निधी वितरणाबाबत माहिती मिळवण्यासाठी मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. लाभ आणि हप्त्यांचे वितरण
पहिल्या मुलासाठी दोन हप्त्यांमध्ये एकूण ₹5,000/- चा लाभ दिला जातो:
1) पहिला हप्ता – ₹1,000/-
2) दुसरा हप्ता – ₹2,000/-
3) तिसरा हप्ता – ₹2,000/-
याशिवाय जननी सुरक्षा योजनेअंतर्गत आणखी ₹1,000/- दिले जातात, ज्यामुळे एकूण ₹6,000/- मिळतात.
अर्ज प्रक्रिया
ऑफलाइन अर्ज : लाभ घेण्यासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्रात (AWC) किंवा मान्यताप्राप्त वैद्यकीय सुविधेला भेट द्या आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करा.
ऑनलाइन अर्ज : PMMVY च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.