नमस्कार आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) ही भारतातील गरीब आणि दुर्बल घटकांसाठी एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत, प्रत्येक कुटुंबाला प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा प्रदान केला जातो. 23 सप्टेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड येथील रांची येथे या योजनेचा प्रारंभ केला होता.
PMJAY ही जगातील सर्वात मोठ्या आरोग्य योजनांपैकी एक आहे. योजनेचा उद्देश 12 कोटीहून अधिक गरीब आणि दुर्बल कुटुंबांना म्हणजे सुमारे 55 कोटी लोकसंख्येला मोफत आणि कॅशलेस आरोग्य सेवा पुरवणे आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचे वय किंवा लिंग कोणतेही अडथळे ठरत नाहीत. रुग्णालयात दाखल होण्याच्या 3 दिवस आधीपासून ते रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच्या 15 दिवसांपर्यंतचा सर्व खर्च यामध्ये समाविष्ट आहे.
आयुर्वेद दिनानिमित्त योजनेत 70 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. लाभार्थ्यांना योग्य रुग्णालये शोधण्यासाठी, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) च्या अधिकृत वेबसाइट nha.gov.in वर PMJAY for 70+ आयकॉनवर क्लिक करून सूची पाहता येते.
आयुष्मान भारत कार्ड कसे तयार करावे
1) सर्वप्रथम योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड बनवा आणि ते आधार कार्डशी लिंक करा.
2) आरोग्य केंद्र किंवा जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रावर जाऊन अर्ज भरा.
3) अर्जासोबत आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो जमा करा.
4) कागदपत्रे तपासल्यानंतर संबंधित अधिकारी तुम्हाला आयुष्मान कार्ड जारी करेल.
ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
1) NHA वेबसाइट किंवा आयुष्मान एपद्वारे ऑनलाइन अर्ज करा.
2) वेबसाइटवर लॉग इन करून नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, कॅप्चा आणि ओटीपीद्वारे पडताळणी करा.
3) PMJAY for 70+ आयकॉनवर क्लिक करून राज्य, जिल्हा, आणि आधारकार्ड क्रमांक भरावा.
4) आधारकार्ड पडताळणीसाठी ओटीपीच्या मदतीने KYC पूर्ण करा.
5) आवश्यक फोटो अपलोड करा आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयुष्मान कार्ड डाउनलोड करा.
गुगल प्ले स्टोअरवरून आयुष्मान एप डाउनलोड करून, लॉग इन करा आणि KYC अपडेट करून कार्ड सुरक्षितपणे मोबाईलमध्ये सेव्ह करता येते.