या सरकारी योजनेत होतोय डब्बल फायदा ! जाणून घ्या सविस्तर माहिती

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
pm suryaghar yojana

मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौरऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत घरांवर सौर पॅनेल बसवण्यासाठी ४०% पर्यंत अनुदान दिले जाते. याचा मुख्य उद्देश १ कोटी कुटुंबांना वीज खर्चात बचत करणे आणि सरकारला दरवर्षी ७५,००० कोटी रुपये वीज खर्चात कमी करण्यास मदत करणे आहे. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मोफत वीज मिळणे. सौर पॅनेल्समुळे घराचे वीज बिल कमी होईल किंवा शून्य होईल.

सौर पॅनेल्सच्या वापरामुळे सरकारला वीज उत्पादनावर होणाऱ्या खर्चात बचत होईल. आणखी एक महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे सौरऊर्जा एक अक्षय स्रोत आहे, त्यामुळे पर्यावरणासाठीही हे फायद्याचे ठरते. सौर पॅनेल्समधून कोणतेही प्रदूषण होत नाही, त्यामुळे ते प्रदूषण कमी करण्यास मदत करतात.

कस कार्य करते ही योजना?

पीएम सूर्य घर मोफत वीज योजना घरांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात घरावर सौर पॅनेल बसवण्याच्या खर्चावर अनुदान मिळते, ज्यामुळे वीज बिल कमी होईल. सौरऊर्जेच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जनात घट होईल आणि पर्यावरणाची सुरक्षा होईल. योजनेचा मुख्य आकर्षण म्हणजे घरांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प स्थापनेसाठी मिळणारे अनुदान आणि इतर फायदे.

सौर पॅनेल्समुळे होणारी बचत

जर ३ किलोवॅट क्षमतेचे सौर पॅनेल बसवल्यास, घराला महिन्याला अंदाजे ३०० युनिट वीज मोफत मिळेल, ज्यामुळे दरवर्षी १५,००० रुपये वाचू शकतात. जर तुमचे वीज बिल सुमारे १८०० ते १८७५ रुपयांच्या दरम्यान असेल, तर तुम्हाला या योजनेतून मोठा फायदा होईल. या योजनेतील एक आकर्षक गोष्ट म्हणजे, जर तुमच्याकडे सौर पॅनेल्सद्वारे अधिक वीज तयार झाली तर ती वीज तुम्ही वीज वितरण कंपनीला विकू शकता.

अनुदानाची रक्कम

सरकार ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर पॅनेलसाठी ४०% आणि २ किलोवॅट क्षमतेसाठी ६०% अनुदान देत आहे. जर तुम्ही ३ किलोवॅट सिस्टीम बसवली, तर तुम्हाला ७८,००० रुपये अनुदान मिळेल.

अर्ज कसा करावा?

तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी https://www.pmsuryaghar.gov.in/consumer या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करताना तुम्हाला काही आधारभूत माहिती द्यावी लागेल, जसे राज्य, वीज वितरण कंपनी, वीज ग्राहक क्रमांक, ईमेल इत्यादी. अर्ज स्वीकारल्यानंतर, डिस्कॉम कडून मंजुरी मिळाल्यावर, तुम्ही नोंदणीकृत विक्रेत्याकडून सौर पॅनेल बसवू शकता.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. यामध्ये ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, वीज बिल आणि छताच्या मालकीचे प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.

भाडेकरू कुटुंबांनाही लाभ मिळवता येईल

भाडेकरू कुटुंबांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो, परंतु काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे. वीज कनेक्शन भाडेकरूच्या नावावर असावे, तसेच घरमालकाची लेखी परवानगी असावी. घर बदलल्यास, सौर पॅनेल्स सहजपणे दुसऱ्या ठिकाणी हलवता येऊ शकतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.