PM Mudra Loan नमस्कार मित्रांनो भारत सरकार नागरिकांसाठी अनेक योजना राबवते, त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना. 2015 साली सुरू करण्यात आलेली ही योजना तरुण आणि लहान व्यावसायिकांना स्वावलंबी बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे. अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.
SBI खातेदारांना मिळणार 11 हजार रुपये, लवकर हा फॉर्म भरा
मुद्रा योजनेची वैशिष्ट्ये
प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून तीन प्रकारचे कर्ज दिले जाते
1) शिशू कर्ज 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
2) किशोर कर्ज 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
3) तरुण कर्ज पूर्वी 10 लाख रुपयांपर्यंत मिळणारे कर्ज आता 20 लाख रुपयांपर्यंत वाढवले आहे. हे कर्ज प्रामुख्याने त्या व्यावसायिकांसाठी आहे, ज्यांनी यापूर्वी कर्ज घेतले आणि वेळेवर परतफेड केली आहे.
खुशखबर ! सप्टेंबर मध्ये अर्ज केलेल्या महिलांना या दिवशी मिळणार 4500 रुपये, पहा यादीत नाव
मुद्रा योजनेचे लाभार्थी
मुद्रा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे
अर्जदार भारतीय नागरिक असावा.
बँकेतील डिफॉल्टर नसावा.
अर्जदाराचा व्यवसाय कॉर्पोरेट संस्था नसावा.
अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि वय 18 वर्षांपेक्षा अधिक असावे.
या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ४००० रुपये, पहा तुमचे नाव यादीत तर नाही ना
कर्जासाठी अर्ज कसा करावा?
1) प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर https://mudra.org.in ला भेट द्या.
2) शिशू, किशोर, किंवा तरुण कर्जाच्या श्रेणीमधून तुमच्या गरजेनुसार एक पर्याय निवडा.
3) निवड केल्यानंतर, अर्ज डाउनलोड करा आणि तो योग्यप्रकारे भरा.
4) आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करा पॅन कार्ड, आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, आयकर रिटर्न, आणि पासपोर्ट आकाराचा फोटो.
5) भरलेला अर्ज जवळच्या बँकेत जमा करा. बँक तुमच्या अर्जाची तपासणी करून महिन्याभरात कर्ज मंजूर करेल.
मित्रानो या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकता आणि स्वावलंबी होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलू शकता.