केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत आणि त्यामध्ये 2018 मध्ये सुरू करण्यात आलेली पीएम किसान योजना आहे. केंद्र शासनाची ही महत्त्वकांशी योजना राज्यातील तसेच देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करते.
पीएम किसान योजनेचे पैसे वर्षाला तीन वेळेस प्रत्येक हंगामाच्या आधी प्रदान केले जातात जेणेकरून शेतकरी त्यांचे बी, बियाणे तसेच इतर शेतीचा खर्च काही प्रमाणात पूर्ण करू शकतील आणि आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 17 हप्ते देण्यात आलेले आहेत 18 वा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेचे ४५०० रुपये या महिलांना मिळणार नाही, यादी झाली जाहीर
पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे परंतु हा हप्ता मिळण्यासाठी आपले ऑनलाइन केवायसी असणे गरजेचे आहे तसेच आपल्याला आपले स्टेटस जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
ऑनलाइन पद्धतीने केवायसी प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्वात प्रथम पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या ऑफिशियल संकेतस्थळावरती जा आणि तिथे फार्मर्स कॉर्नर नावाचा पर्याय देण्यात आलेला आहे त्यावरती क्लिक करा आणि केवायसी वरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि रजिस्टर मोबाईल नंबर वरील ओटीपी टाकून केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
अदिती तटकरे यांची घोषणा , माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे या तारखेला होणार , व्हिडिओ पहा
आपल्याला पुढील हप्ता मिळणार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आपले स्टेटस जाणून घ्यावे लागेल त्याकरिता ऑफिशियल वेबसाईट वरती जा आणि Know your status पर्यायावर क्लिक करा आणि आपले पीएम किसान योजनेचे स्टेटस जाणून घ्या. जर कोणत्याही कारणाने तुमचा अर्ज बाद झालेला असेल तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही.