PM Kisan Yojana : मंडळी देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १९व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यासंबंधी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले आहे की, लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.
२४ फेब्रुवारीला हप्त्याचा लाभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १९वा हप्ता जारी करतील. यासोबतच, ते शेतीसंबंधित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील तसेच राज्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या योजनांचा शुभारंभही करतील.
दरवर्षी ६ हजार रुपयांचा लाभ
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट ट्रान्सफर केली जाते. यापूर्वीचा १८वा हप्ता पंतप्रधान मोदींनी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केला होता.
ई-केवायसी अनिवार्य – अन्यथा हप्ता अडकू शकतो
सरकारने योजनेचा लाभ केवळ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक केले आहे. जर ई-केवायसी पूर्ण केले नसेल, तर हप्ता अडकू शकतो.
ई-केवायसी करण्याचे सोपे मार्ग
1) PM-KISAN पोर्टल किंवा मोबाइल एपद्वारे करता येते.
2) कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) आणि राज्य सेवा केंद्र (SSK) येथे उपलब्ध.
3) PM-KISAN मोबाइल एपच्या माध्यमातून करता येते.
लाभ मिळवण्यासाठी त्वरित ई-केवायसी पूर्ण करा
ज्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावे. सरकारने स्पष्ट केले आहे की ई-केवायसीशिवाय कोणताही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले ई-केवायसी अपडेट करून हप्त्याचा लाभ घ्यावा.