शेतकरी मित्रांनो पिएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये दिले जातात. या योजनेला आता सहा वर्षे पूर्ण झाली आहेत, आणि यानंतर 18 हप्ते शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत. 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. योजनेच्या 20 व्या हप्त्याशी संबंधित सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत.
PM Kisan योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी म्हणजेच ओळख क्रमांक मिळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक लिंक करणे आवश्यक असेल. शेतकऱ्यांना ओळख क्रमांक मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे, आणि हे नियम आगामी हप्त्यांसाठी अनिवार्य ठरले आहेत. 19 व्या हप्त्यासाठी हे नियम लागू होणार नाहीत, त्यामुळे या हप्त्याचे वितरण सर्व शेतकऱ्यांना होईल.
20 व्या हप्त्यासाठी नवीन अटी
PM Kisan योजनेचा 20 वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ओळखपत्र आवश्यक असेल. तसेच, नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पती, पत्नी आणि 18 वर्षाखालील सदस्यांची आधार नोंदणी करणे बंधनकारक आहे. जर या नियमांचे पालन न केले, तर संबंधित शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ बंद होईल. ओळखपत्र नसलेल्या शेतकऱ्यांचे लाभार्थी म्हणून नोंदणी रद्द केली जाईल.
नवीन नियमांची अंमलबजावणी केल्यास, शेतकऱ्यांना योजनेचा अधिक पारदर्शक आणि सुरक्षीत लाभ मिळवता येईल.