शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती, जी केंद्र सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी सुरू केली. या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये प्रदान करते, आणि ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केली जाते.
शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा आहे. या हप्त्याची अपेक्षीत तारीख फेब्रुवारी 2025 आहे, पण या संदर्भात अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
योजनेच्या अटी
1) या योजनेचा लाभ त्याच शेतकऱ्याला मिळतो ज्याने कर भरला नसेल.
2) कुटुंबातील सदस्य (पती, पत्नी आणि अवयस्क मुले) हे योजनेच्या लाभासाठी पात्र असतात. पण जर शेतीयोग्य जमीन इतर सदस्यांच्या (जसे की आजोबा, वडील) नावावर असेल, तर त्या कुटुंबाला लाभ मिळणार नाही.
3) पती-पत्नींपैकी एकाने या योजनेचा लाभ घेतल्यास दुसऱ्याला त्याचा लाभ मिळणार नाही.
4) शेतकरी जर सरकारी नोकरीत असेल, तर त्यालाही योजनेचा लाभ मिळणार नाही.
5) नोंदणीकृत डॉक्टर, अभियंता, वकील आणि सीए यांसारख्या व्यावसायिकांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
6) ज्यांना वर्षभरात 10,000 रुपयांची पेन्शन मिळते, त्यांना देखील योजनेचा लाभ मिळणार नाही.
शेतकऱ्यांसाठी ही योजना एक महत्त्वाचा आर्थिक आधार आहे, आणि प्रत्येक शेतकऱ्याने या अटींचा विचार करूनच योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे.