नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या आगामी हफ्त्याची शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना सोयीस्कर सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध नवीन पर्याय आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी तक्रारींसाठी नोडल ऑफिसरचा सिंगल पॉइंट संपर्क क्रमांक दिला आहे. शेतकरी राज्य आणि जिल्हा स्तरावरून हे संपर्क क्रमांक प्राप्त करू शकतात. चला या प्रक्रियेविषयी सविस्तर जाणून घेऊया.
संपर्क यादी कशी पाहावी?
1) पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
2) वेबसाइटवर गेल्यानंतर, पेजच्या खाली Search Your Point Of Contact या पर्यायावर क्लिक करा.
3) सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट पेजवर आल्यानंतर दोन पर्याय दिसतील – राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय नोडल ऑफिसर.
4) राज्यस्तरीय नोडल ऑफिसरची माहिती अद्ययावत न झाल्याने, जिल्हास्तरीय माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे Search District Nodal हा पर्याय निवडा.
5) त्यानंतर तुमच्या राज्य आणि जिल्हा निवडून सर्च पर्यायावर क्लिक करा.
6) जर तुम्ही नाशिक जिल्हा निवडला, तर नाशिकमधील नोडल ऑफिसरची यादी आणि संपर्क क्रमांक दिसतील.
7) यामध्ये तहसीलदार, कृषी अधिकारी यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध होतील.
या यादीमध्ये विविध जिल्ह्यांतील नोडल ऑफिसरची माहिती असणार आहे, ज्यांच्या सहाय्याने शेतकरी तक्रारींसाठी संपर्क साधू शकतात.