नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी योजनेतील बोगस लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ईकेवायसी (e-KYC) करणे अनिवार्य केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
PM किसान योजनेच्या अटी
1) लाभार्थ्याच्या नावावर 2019 पूर्वी जमीन नोंद असणे आवश्यक आहे.
2) 2019 नंतर खरेदी केलेली जमीन, खातेफोड, किंवा बक्षीसपत्राच्या आधारावर लाभ मिळणार नाही.
3) 1 फेब्रुवारी 2019 नंतर वारसा हक्काने नोंद झालेल्या जमिनीवर लाभ लागू होतो.
4) कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा किंवा मुलगी यापैकी एकच व्यक्ती योजनेसाठी पात्र ठरेल.
5) लाभार्थी शासकीय, निमशासकीय कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारक नसावा.
6) नोंदणीकृत डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सीए, आर्किटेक्ट यांना लाभ दिला जाणार नाही.
7) सलग इन्कमटॅक्स भरणारे किंवा नोंदणीकृत व्यवसाय असणारे व्यक्ती योजनेसाठी अपात्र आहेत.
8) आजी-माजी खासदार, आमदार किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष लाभ घेऊ शकत नाहीत.
ईकेवायसीचे महत्व
महाराष्ट्रातील तब्बल 15 लाख शेतकऱ्यांनी अद्याप ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते.
ईकेवायसी पूर्ण न केल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही, तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी देखील अपात्र ठरू शकता. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ईकेवायसी केली नाही, त्यांनी ती त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे.
ईकेवायसी तपासण्यासाठी मार्गदर्शक
1)https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.project.pmkisan प्ले स्टोअरमधून डाउनलोड करा.
2) एप उघडा व आवश्यक परवानग्या द्या.
3) भाषा निवडा व Update Mobile Number वर क्लिक करा.
4) रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार क्रमांक टाकून सर्च करा.
5) तुमची ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण आहे का ते तपासा.
अधिक माहितीसाठी
PM किसान योजनेबाबत अधिक माहिती व तपशीलासाठी https://pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
लवकरात लवकर ईकेवायसी पूर्ण करा आणि योजनेचा लाभ घ्या