PM Kisan Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी केली आहे, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. त्यातली एक अत्यंत लोकप्रिय योजना म्हणजे पीएम किसान योजना (PM Kisan Yojana). या योजनेत आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांना मदत झाली आहे.
पीएम किसान योजनाची ओळख
२०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये देण्यात येतात, जे २,००० रुपयांच्या तीन हप्त्यात वितरित केले जातात. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळत आहे, ज्याचा उपयोग त्यांनी त्यांच्या शेतीसाठी करू शकतात.
नवीन नियमावली
योजनेसाठी एक नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमांनुसार जर शेतकऱ्याने २०१९ पूर्वी जमिनी खरेदी केली असेल आणि वारसा हक्कातून जमीनीच्या नोंदीत त्याचे नाव असले तरी त्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो. याशिवाय, आता पती, पत्नी आणि मुलांच्या आधार कार्डाची नोंदणी करणे अनिवार्य झाले आहे.
लाभार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे
1) लाभार्थी शेतकऱ्याचा नवीन सातबारा उतारा
2) शेतकऱ्याचा आठ अ उतारा
3) लाभार्थी शेतकऱ्यांच्या पती-पत्नीचे आधार कार्ड
4) लाभार्थी शेतकऱ्यांचा फेरफार
5) विहित नमुना अर्ज
6) शिधापत्रिका
योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्यांनी या सर्व कागदपत्रांची तयारी करून संबंधित कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांना या योजनांचा अधिकृत लाभ मिळविण्यात मदत होईल.