नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. जर तुम्ही देखील पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल. अनेक शेतकऱ्यांना या योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल माहिती नाही असं दिसून येतं. त्यामुळे त्यांच्यासाठी थोडक्यात आणि स्पष्ट माहिती घेऊन आलो आहे.
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहेत. यामध्ये राज्य सरकार देखील 6,000 रुपये आणि केंद्र सरकार देखील 6,000 रुपये मिळवून 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पद्धतीने जमा केले जातात.
PM किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाची योजना असून, महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी योजना त्याच प्रकारची आहे. याआधी, 18 हप्ते शेतकऱ्यांना दिले गेले आहेत. आता, शेतकरी सर्वत्र 19 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
PM Kisan 19th Installment 2024
आतापर्यंत 18 हफ्ते शेतकऱ्यांना वितरित केले गेले आहेत, आणि आता 19 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळविण्याची अपेक्षा आहे. पीएम किसान योजनेत प्रत्येक हप्ता चार महिन्यांच्या अंतराने दिला जातो. केंद्र सरकार प्रत्येक चार महिन्यांनी 1 हप्ता जारी करते. 18 वा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिला गेला होता. त्यानुसार 19 व्या हप्त्याची रक्कम फेब्रुवारी 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
याबाबत कोणतेही अधिकृत अपडेट अजून आलेले नाहीत. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
शेतकऱ्यांना मिळणारी मदत
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 12,000 रुपये प्रति वर्ष दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना बियाणे, कीटकनाशके, आणि इतर शेतीसंबंधित आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी वापरता येतात. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे उत्पादन वाढविण्यास मदत मिळते. तुम्ही अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नियमितपणे भेट द्या.