PM Kisan Installment देशातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतला आहे. हे शेतकरी सध्या योजनेच्या 18 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. पण काही शेतकऱ्यांचा पुढील हप्ता अडकण्याची शक्यता आहे.
भारत सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे, ज्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना होत आहे. आजही अनेक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कमजोर आहे, आणि त्यांना मदतीची आवश्यकता आहे. अशा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारने 2019 साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली.
या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सरकार ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करते. आतापर्यंत या योजनेचे 17 हप्ते पाठवले गेले आहेत.
पण काही शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील 2,000 रुपयांचा हप्ता येणार नाही. यामागचं कारण म्हणजे काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि जमीन पडताळणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही. त्यामुळे, ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांना 18 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि ई-केवायसी तसेच जमीन पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर ती त्वरित पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं.