केंद्र शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात येतात आणि यामधील एक महत्त्वाची योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांचा निधी दिला जातो जो वर्षात तीन टप्प्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये याप्रमाणे प्रदान केला जातो आणि यासाठी राज्यातील लाखो शेतकरी पात्र ठरलेले आहेत तसेच त्यांना पीएम किसान चा लाभ प्राप्त होत आहे.
परंतु आता कोल्हापूर जिल्ह्यातील 13353 शेतकरी पीएम किसान चा हप्ता मिळवण्यास अपात्र ठरणार आहेत नवीन प्राप्त झालेल्या माहितीनुसार या सर्व शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्यांची बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केलेले नाही आणि जर आपलं आधार कार्ड हे बँक खात्याबरोबर लिंक नसेल तर त्यावरती डीबीटी पद्धतीने पैसे पाठवले जात नाहीत.
शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे बँक खात्याबरोबर लिंक करण्याचे राहिलेले असेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड बँक खात्याबरोबर लिंक करावे असे शासनाच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे कारण आता पुढील पीएम किसान चा अठरावा हप्ता लवकरच प्रदान केला जाणार आहे.
पीएम किसान योजनेची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत 17 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत आणि पुढील आठवा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. नवरात्र तसेच विजयादशमीच्या आधी पीएम किसान योजनेचा हप्ता दिला जाऊ शकतो.
E-Pik Vima Grant : खुशखबर ! या शेतकऱ्यांना मिळणार ई-पीक विम्याचे अनुदान , पहा जिल्हानिहाय यादी
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4 लाख 65 हजार 950 शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यामध्ये 13353 शेतकऱ्यांनी आतापर्यंत आधार लिंकिंग प्रक्रिया पार पाडलेली नाही. जर तुमचे पण आधार कार्ड हे बँक अकाउंट बरोबर लिंक करण्याचे राहिलेले असेल तर तुम्ही तुमच्या बँकेला भेट द्यावी आणि तिथे आपले आधार कार्ड बँक अकाउंट वर लिंक करण्याची प्रक्रिया पार पाडावी.