मित्रानो केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना लागू केल्या आहेत. भारत कृषीप्रधान देश असल्यामुळे, सरकार शेतकऱ्यांसाठी विशेष प्रयत्न करते आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून नवीन योजना सादर करते.
अशाच योजनांमध्ये, काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने सुरू केलेली पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) खूपच लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते, जे तीन समान हप्त्यांमध्ये त्यांच्या बँक खात्यात जमा होतात.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास १८ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, आणि आता पुढील म्हणजेच १९व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ लवकरच मिळणार आहे.
याआधी ५ ऑक्टोबर २०२४ रोजी १८वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला, ज्यातून सुमारे ९.४ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. ही रक्कम दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये म्हणजे एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर, आणि डिसेंबर-मार्च या कालावधीत दिली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, १९वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना बनली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यावश्यक आहे. जर तुम्ही अद्याप ई-केवायसी पूर्ण केले नसेल, तर एम किसान पोर्टलवर जाऊन ते करून घ्यावे, अन्यथा या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.