मित्रांनो तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा (PMAY) दुसरा टप्पा सरकारने सुरू केला आहे. या योजनेचा उद्देश शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना घर खरेदीसाठी आर्थिक मदत पुरवणे हा आहे.
योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
PMAY-U 2.0 अंतर्गत १ कोटी नवीन कुटुंबांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र लाभार्थी आता ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्ज कसा करावा?
1) अधिकृत वेबसाईटला भेट द्या https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx
2)Apply for PMAY-U 2.0 पर्यायावर क्लिक करा.
3) नवीन पृष्ठ उघडल्यानंतर आवश्यक तपशील भरून अर्ज सबमिट करा.
4) पात्रता पडताळणीनंतर पुढील प्रक्रियेसाठी तुमचा आधार क्रमांक व नाव प्रविष्ट करा.
5) नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल तो प्रविष्ट करून पुढील चरण पूर्ण करा.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
1) अर्जदार व कुटुंबीयांचे आधार क्रमांक व संबंधित माहिती.
2) IFSC कोडसहित सक्रिय बँक खाते.
3) (फक्त PDF स्वरूपात, 200 KB पर्यंत).
4) SC/ST/OBC असल्यास (फक्त PDF स्वरूपात, 200 KB पर्यंत).
5) लाभार्थी आधारित बांधकामासाठी (PDF स्वरूपात, 5 MB पर्यंत).
महत्वाची टीप – जर तुम्ही पात्र नसाल, तर तुमचा अर्ज थांबवला जाईल. पात्रतेच्या अटी व शर्तींचे पालन करूनच अर्ज भरणे गरजेचे आहे.
PMAY-U 2.0 ही योजना तुमच्या स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी एक उत्तम संधी आहे. वेळ वाया न घालवता अर्ज भरा आणि या योजनेचा लाभ घ्या!