नमस्कार मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना पक्के घर मिळावे यासाठी विविध योजना उपलब्ध आहेत. या योजनांच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या यादी प्रकाशित केल्या जातात. आज आपण पाहणार आहोत की घरकुल यादी आपल्या मोबाईलवर कशी तपासायची.
नवीन घरकुल यादी 2024 कशी तपासायची
प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेअंतर्गत 2023 मध्ये लाभार्थ्यांची नवीन यादी प्रकाशित करण्यात आली आहे. अनेकांना ही यादी कशी पहावी, याची माहिती नसते, त्यामुळे पात्र असूनही काही लोकांना लाभ मिळत नाही. ही यादी मोबाईलवर कशी तपासता येईल, याची माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेत कोण पात्र ठरतात?
प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेअंतर्गत ज्यांना घर नाही आणि जे कुडा-मातीच्या घरात किंवा झोपडपट्टीत राहतात, अशा नागरिकांना पक्क्या घरासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
घरकुल यादी कशी तपासावी? (Gharkul Yadi Online Check 2024)
1) खालील लिंकवर जा https://rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx
2) तुमचे राज्य निवडा.
3) तुमचा जिल्हा निवडा.
4) तुमचा तालुका निवडा.
5) तुमची ग्रामपंचायत निवडा.
6) ज्या वर्षाची यादी तपासायची आहे ते वर्ष निवडा.
7) ज्या योजनेची यादी पहायची आहे ती योजना निवडा.
वरील सर्व माहिती भरून घेतल्यानंतर, एक सुरक्षा कोड (कॅप्चा) दिसेल, तो योग्यरित्या भरून सबमिट करा. काही क्षणात तुमच्या मोबाईलवर यादी दिसेल. यादी डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड PDF या पर्यायावर क्लिक करा.
अशा प्रकारे घरकुल यादी घरबसल्या सहज तपासता येते.