PM-AASHA Scheme : राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना विविध अडचणींपासून वाचवण्याकरता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याकरता या योजनांचा उपयोग होतो आणि आता 2025-26 च्या आर्थिक वर्षासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून 35 हजार कोटी खर्च करून योजना सुरू झालेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरामध्ये आशा योजना सुरू करण्यात आलेले आहे आणि या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही योजना शेतकरी केंद्रित आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि तो स्वावलंबी बनवा यासाठी ही योजना महत्त्वाची आहे.
EPFO Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पेन्शन मध्ये इतकी रुपयाची वाढ होणार
आशा योजनेमध्ये देशभरातील शेतकऱ्यांना संरक्षण प्राप्त होते. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जर शेतकऱ्यांच्या पिकाचा भाव निर्धारित एमएसपी च्या खाली गेला तरी पण सरकारकडून निर्धारित केलेल्या एमएसपी मध्ये शेतकऱ्यांचे पीक, धान्य, कडधान्य इत्यादी खरेदी केले जाते.
पीएम आशा योजनेसाठी केंद्र शासनाकडून 35 हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. पीएम आशा योजनेअंतर्गत शेतकरी आणि ग्राहक यांना योग्य सुविधा प्रधान केल्या जातील जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव भेटेल. पीएम आशा योजनेमुळे देशांतर्गत गरजा पूर्ण होऊन आयातीची गरज पडणार नाही अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Post Office PPF Yojana : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत रु.40,000 गुंतविले तर तुम्हाला मिळतील रु. 10,84,856
पीएम आशा योजनेमुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेलच त्याचबरोबर ग्राहकांना योग्य दरामध्ये शेतीमाल उपलब्ध होईल आणि त्यामुळे या योजनेची सर्वत्र चर्चा आहे. पीएम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होताना बघायला मिळत आहे.