मंडळी महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध नवीन योजना राबवत असते. याच पार्श्वभूमीवर, पीव्हीसी पाईपलाइन अनुदान योजना 2025 ही महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पीव्हीसी आणि एचडीपीई पाईपसाठी १५,००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि अनुदानाचे प्रमाण याबद्दल संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये
- केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ही योजना राबवली जात आहे.
- पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी फार्मर पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर केल्यानंतर सात दिवसांच्या आत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
- योजनेअंतर्गत पीव्हीसी आणि एचडीपीई पाईपसाठी वेगवेगळ्या प्रमाणात अनुदान दिले जाते.
अनुदानाचे प्रमाण
- SC आणि ST प्रवर्गासाठी — १००% अनुदान.
- सर्वसाधारण प्रवर्गासाठी
- एचडीपीई पाईपसाठी — ५० रुपये प्रति मीटर.
- पीव्हीसी पाईपसाठी— ३५ रुपये प्रति मीटर.
- या अनुदानामुळे शेतकऱ्यांना १५,००० रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सातबारा उतारा
- पाईप खरेदीसाठी कोटेशन
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
1) महाडीबीटी फार्मर पोर्टल (Mahadbt Farmer Scheme 2025) वर लॉगिन करा.
2)पीव्हीसी/एचडीपीई पाईप अनुदान योजना निवडा आणि आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा.
3) आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
4) अर्ज मंजूर झाल्यानंतर पूर्वसंमती मिळते.
5) त्यानंतर, शेतकऱ्यांनी पाईप खरेदी करून त्याचे बिल महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावे.
6) सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते.
अधिक माहिती साठी
- अधिकृत महाडीबीटी संकेतस्थळाला भेट द्या.
- शेतकऱ्यांना अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाईपलाइन सुविधेचा उपयोग करून घ्यावा. त्वरित अर्ज करा आणि अनुदानाचा लाभ मिळवा.