मंडळी राज्यात 25% पीक विमा वितरीत करण्यात आले आहे आणि कापणी प्रयोग अहवालानंतर उर्वरित विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वितरित केली जात आहे. पिकविमा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना 25% विम्याची रक्कम मिळाली आहे, तर उर्वरित 75% विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. तरीही, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांना पीक विमा का मिळत नाही? याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
तुम्हाला पीक विमा का मिळत नाही, त्यामध्ये तुमच्याकडून काय त्रुटी झाल्या आहेत आणि तुम्हाला पीक विमा मिळाला आहे की नाही, याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खालील बाबी तपासाव्यात.
1) सरकारच्या नवीन नियमांनुसार, सर्व सरकारी योजनांचे पैसे, यामध्ये पीक विमा, नुकसान भरपाई आणि दुष्काळ अनुदान, थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केले जातात. त्यामुळे तुम्ही खात्री करा की तुमचं बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही. पिकविमा अर्ज करतांना दिलेल्या खात्याचा नंबर आधारशी लिंक असावा लागतो.
2) तुमचा पीक विमा अर्ज जर फेटाळला गेला असेल किंवा त्यामध्ये कोणतीही चूक असलेली असेल, तर तुम्ही पीक विमा लाभापासून वंचित राहू शकता. अशा परिस्थितीत, तुमच्या अर्जाची स्थिती तपासा.
3) काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, कापूस किंवा इतर पिकांसाठी पीक विमा मंजूर केला आहे. तुम्ही ज्या पिकासाठी विमा भरला आहे, त्या पिकासाठी तुमच्या महसूल विभागात पीक विमा मंजूर झाला आहे का हे तपासा.
4) विमा कंपनीच्या नियमांनुसार, ई-पिक पाहणी अनिवार्य आहे. जर तुम्ही ई-पिक पाहणी केली नाही, तर तुम्हाला पीकविमा लाभ मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते.
पीक विमा स्थिती कशी तपासावी?
जर तुम्हाला अद्याप पीक विमा मिळालेला नसेल, तर तुम्ही थेट विमा कंपनीला संपर्क साधून तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. विमा नोंदणी पावतीवर असलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा. तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती, पीक विमा मिळालाय का आणि किती रक्कम मिळाली आहे, याबाबत माहिती मिळवता येईल.
तुम्हाला पीक विमा मिळालाय का, ते तपासण्यासाठी विमा कंपनीकडून प्राप्त होणारी माहिती महत्त्वाची आहे.