नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी पावसाचा खंड पडल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली. अनेक शेतकऱ्यांना आमच्या जिल्ह्यात पिक विमा किती मिळणार? हा प्रश्न होता. याच संदर्भात जिल्हानिहाय पिक विमा यादी पुढीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासनाने या टप्प्यात 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांसाठी 1700 कोटी रुपयांचा अग्रीम पिक विमा मंजूर केला आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या माहितीनुसार, बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच पिक विम्याची आगाऊ रक्कम जमा केली जाईल. पिक विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात 35 लाख शेतकऱ्यांसाठी 1700 कोटी रुपयांचा पिक विमा वितरित करण्यासाठी मान्यता दिली आहे.
काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जमा झाल्याची माहिती पाठवण्यात आली आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना लवकरच त्यांची विमा रक्कम बँक खात्यात मिळेल.
अंतरिम नुकसान भरपाई (MSA)
जिल्हा प्रशासनाने पिक विमा कंपन्यांना नोटीस जारी केली होती, ज्यामुळे विमा कंपन्यांना 25% आगाऊ पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना देणे आवश्यक होते. काही विमा कंपन्यांनी विभागीय आणि राज्यस्तरीय आव्हान केले, त्यामुळे अपीलावर सुनावणी सुरू करण्यात आली. संबंधित कंपन्यांनी एकूण 1700 कोटी रुपयांची भरपाई देण्याची मान्यता दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांना लवकर पिकविमा वितरित करण्याची विनंती केली, त्यानंतर या प्रक्रियेतील सुनावणी तातडीने पूर्ण केली गेली. यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या 2-3 दिवसांत पिकविमा वितरित केला जाईल.
जिल्हानिहाय पिक विमा वितरण
नाशिक जिल्ह्यात 3,50,000 शेतकऱ्यांना 155.74 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात 16,921 शेतकऱ्यांना 4 कोटी 88 लाख रुपये, अहमदनगर जिल्ह्यात 2,31,831 शेतकऱ्यांना 160 कोटी 28 लाख रुपये, सोलापूर जिल्ह्यात 1,82,534 शेतकऱ्यांना 111 कोटी 41 लाख रुपये, सातारा जिल्ह्यात 40,406 शेतकऱ्यांना 6 कोटी 74 लाख रुपये, सांगली जिल्ह्यात 98,372 शेतकऱ्यांना 22 कोटी 4 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
बीड जिल्ह्यात 7,70,574 शेतकऱ्यांना 241 कोटी 21 लाख रुपये, बुलडाणा जिल्ह्यात 36,358 शेतकऱ्यांना 18 कोटी 39 लाख रुपये, धाराशिव जिल्ह्यात 4,98,720 शेतकऱ्यांना 218 कोटी 85 लाख रुपये, अकोला जिल्ह्यात 1,77,253 शेतकऱ्यांना 97 कोटी 29 लाख रुपये, कोल्हापूर जिल्ह्यात 228 शेतकऱ्यांना 13 लाख रुपये, जालना जिल्ह्यात 3,70,625 शेतकऱ्यांना 160 कोटी 48 लाख रुपये, परभणी जिल्ह्यात 4,41,970 शेतकऱ्यांना 206 कोटी 11 लाख रुपये, नागपूर जिल्ह्यात 63,422 शेतकऱ्यांना 52 कोटी 21 लाख रुपये, लातूर जिल्ह्यात 2,19,535 शेतकऱ्यांना 244 कोटी 87 लाख रुपये, आणि अमरावती जिल्ह्यात 10,265 शेतकऱ्यांना 8 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या यादीतील शेतकऱ्यांना लवकरच त्यांची पिक विमा रक्कम त्यांच्या बँक खात्यात मिळेल.