नमस्कार मित्रांनो खरीप हंगामात वेळेवर पाऊस न पडणे आणि अतिपाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील खरीप पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या 2,28,441 शेतकऱ्यांपैकी 1,25,600 शेतकऱ्यांना 42 कोटी 13 लाख 9 हजार रुपयांची नुकसानभरपाई वाटप करण्यात आली आहे अद्याप 1,02,841 शेतकरी या नुकसानभरपाईपासून वंचित आहेत.
राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया हप्ता भरून पीक विमा काढण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. या योजनेसाठी 31 जुलै ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत वाढवून 3 ऑगस्टपर्यंत करण्यात आली होती.
तालुकानिहाय पाहता हवेली तालुक्यात 1,391 शेतकऱ्यांना 19.20 लाख रुपयांची भरपाई मिळाली आहे. खेड तालुक्यात 15,335 शेतकऱ्यांना 660.31 लाख रुपये, आंबेगाव तालुक्यात 13,944 शेतकऱ्यांना 423.68 लाख रुपये, तर जुन्नर तालुक्यात 27,793 शेतकऱ्यांना 1,385.88 लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
शिरूर तालुक्यात 24,533 शेतकऱ्यांना 497.29 लाख रुपये, पुरंदर तालुक्यात 13,307 शेतकऱ्यांना 250 लाख रुपये, दौंड तालुक्यात 2,792 शेतकऱ्यांना 54.26 लाख रुपये, बारामती तालुक्यात 19,430 शेतकऱ्यांना 669.50 लाख रुपये, आणि इंदापूर तालुक्यात 7,075 शेतकऱ्यांना 253.78 लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली आहे.
शासनाच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे.