नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना, खास करून ज्यांनी 2025 साठी पिक विमा नोंदणी केली आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले. त्याच प्रमाणे, शेतकऱ्यांना पिक विमा मिळवण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत होते. आता पिक विमा वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्हाला पिक विमा मिळाला आहे का हे घरबसल्या तपासू शकता. कसे तपासायचं ते या लेखामध्ये पाहूयात.
सर्वप्रथम PMFBY अधिकृत वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटवर Farmer Corner या पर्यायावर क्लिक करा आणि Login Farmer पर्यायावर क्लिक करा. नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि Request OTP या पर्यायावर क्लिक करा.
तुम्ही पिक विमा अर्ज नोंदणी करतांना मोबाईल नंबर वापरला असल्यास, तुमच्या आधार कार्ड नंबरची माहितीही देणे आवश्यक आहे. ओटीपी तुमच्या मोबाईलवर येईल, तो ओटीपी टाकून Submit वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला Year आणि Season निवडायचा आहे, आणि नंतर तुम्हाला तुमच्या पॉलिसीची माहिती दिसेल. पॉलिसीवर क्लिक करून View Status वर क्लिक करा आणि तुम्हाला पिक विमा मिळाल्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल, जसे की तुम्हाला किती पैसे मिळाले, ते कोणत्या पिकासाठी मिळाले, आणि ते कधी आले याची सविस्तर माहिती.
जर तुम्हाला पिक विमा मिळाल्याची माहिती मिळाली, तर कृपया ती आपल्या मित्रांना आणि व्हाट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. ह्या प्रक्रियेतून तुम्ही घरबसल्या तुमच्या पिक विमा माहिती तपासू शकता.