नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या राज्यातील शेतकऱ्यांना पिकविमा, नुकसान भरपाई, आणि शासकीय अनुदानाचे वितरण सुरू आहे. शासनाने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार यापुढे सर्व प्रकारचे अनुदान आणि योजनांचे हप्ते आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहेत. यात पिकविमा, नुकसान भरपाई, पिएम किसान योजना, नमो शेतकरी योजना आणि इतर अनुदानांचा समावेश आहे.
आधारशी बँक खाते लिंक असणे का महत्त्वाचे आहे?
- जर पिकविमा भरताना दिलेला बँक खाते क्रमांक आधारशी लिंक नसेल, तर त्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.
- सरकारच्या DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे अनुदान थेट आधारशी लिंक असलेल्या खात्यातच जमा होते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या आधारशी कोणती बँक खाते लिंक आहे हे तपासणे गरजेचे आहे. आधारशी कोणती बँक लिंक आहे हे कसे पाहावे?
तुमच्या आधारशी कोणती बँक खाते लिंक आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील प्रक्रिया करा.
1) आधारच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या https://myaadhaar.uidai.gov.in/.
2) Login या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक टाका आणि Send OTP वर क्लिक करा.
- आलेला OTP टाकून लॉगिन करा.
3) Bank Seeding Status तपासा
- लॉगिन केल्यानंतर Bank Seeding Status या पर्यायावर क्लिक करा.
- येथे तुमच्या आधारशी कोणती बँक लिंक आहे याची माहिती दिसेल.
तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का?
तुमच्या लिंक असलेल्या बँक खात्यात पिकविमा, नुकसान भरपाई, पिएम किसान योजना, आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले आहेत की नाही, हे तपासा.
शेतीसाठी उपयुक्त माहिती
शेतकऱ्यांनी वेळोवेळी ही माहिती तपासत राहणे महत्त्वाचे आहे. तसेच हि माहिती इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा आणि आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील होऊन शेतीविषयक अपडेट्स मिळवा.