नमस्कार मित्रांनो कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती सतत कमी-जास्त होत असतात, तरीही आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अपेक्षित कपात होताना दिसत नाही. पण महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इंधनाच्या दरात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार विधानसभा निवडणुका जवळ येत असताना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुका होण्यापूर्वी पेट्रोल पंपांवर प्रति लिटर किमान २ रुपयांची घसरण होऊ शकते.
जिल्हानिहाय दर येथे पहा
मित्रानो गेल्या दोन वर्षांत इंधनाच्या दरात फारसा बदल झाला नाही. केवळ लोकसभा निवडणुकीच्या वेळी इंधनाच्या किमतींमध्ये काही प्रमाणात घट झाली होती. यानंतर पण कोणताही मोठा बदल झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे, ज्यावर अधिकाऱ्याने थेट उत्तर देण्याचे टाळले.
जिल्हानिहाय दर येथे पहा
नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत, आणि त्याआधीच पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूकपूर्वीच दर कमी होण्याची शक्यता असून, राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हे निर्णय होण्याची शक्यता आहे.
या नागरिकांच्या वीज बिलात सवलत मिळणार, यांचे वीज बिल होणार स्वस्त
भारतात जो जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे, इंधनाच्या किंमतींमध्ये अस्थिरता कायम असते. भारत आपली ८७% इंधन गरज परदेशातून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमतींवर देशातील दर ठरतात.