नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होण्याच्या पार्श्वभूमीवर इंधनदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किमान 2 रुपयांनी घट होऊ शकते, अशी चर्चा सध्या आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती सातत्याने बदलत असताना, भारतात मात्र इंधनाचे दर स्थिर आहेत. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति पिंप 70 डॉलरपेक्षा खाली घसरल्या आहेत, डिसेंबर 2021 नंतर तेलाच्या किमतींमध्ये एवढी मोठी घसरण पहिल्यांदाच झाली आहे.
पॅनकार्ड धारकांसाठी नवीन नियम : हे काम केले असेल तर तुम्हाला दंड बसणार नाही
लोकसभा निवडणुकीच्या वेळी इंधन दरात काहीशी कपात झाली होती, परंतु मागील दोन वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी इंधनदरात कपात होईल का, हा प्रश्न लोकांमध्ये निर्माण झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता असल्यामुळे, निवडणुकीपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होईल अशी अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता , या शेतकऱ्यांचे वीजबिल सरसकट माफ , यादी पहा
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश असून, आपली 87% गरज परदेशी स्त्रोतांवर अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर भारत आता जास्तीत जास्त कच्चे तेल खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे, ज्यामुळे इंधन दर कमी होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत 104.87 रुपये प्रति लिटर असून, डिझेलची किंमत 91.31 रुपये प्रति लिटर आहे. इंधन दरातील या संभाव्य कपातीमुळे सर्वसामान्य नागरिकांना निवडणुकीपूर्वीच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.