नमस्कार मित्रांनो पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनावर अवलंबून असतात. पेट्रोलियम कंपन्या त्यासंदर्भातील निर्णय घेतात. इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत 10 टक्के वाढ झाली आहे, ज्यामुळे तेलाने प्रति बॅरल 78 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. या वाढीचा भारतातील पेट्रोलच्या किमतीवर परिणाम होणार का, याबाबत भारत सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या मते, पश्चिम आशियातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 70 डॉलर्सवरून 78 डॉलर्सपर्यंत वाढल्या आहेत. तरीही सध्या तेलाच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कच्चे तेल आयात करणारा देश असल्यामुळे या संघर्षाचा भारतावर काय परिणाम होईल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण पुरी यांनी स्पष्ट केले की, भारतात तेलाचा तुटवडा नाही आणि देश या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीचे महत्त्व
इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्यास, इराण होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो. होर्मुझ सामुद्रधुनी हे जगातील एक प्रमुख तेल वाहतूक केंद्र आहे. इराणमधील तेल आणि आण्विक प्रकल्पांवर हल्ले झाल्यास, याचा तेलाच्या किमतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी, रेटिंग एजन्सी ICRA ने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 2-3 रुपयांनी घट होईल, असे भाकीत केले होते.
तेल निर्यातीवर परिणाम होणार नाही
सौदी अरेबिया, इराक, कुवेत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) हे प्रमुख तेल उत्पादक देश होर्मुझ सामुद्रधुनीच्या माध्यमातून तेल निर्यात करतात. सोदी अरेबिया आणि UAE या देशांमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीवर अवलंबून नसलेल्या पाइपलाइनच्या सुविधा आहेत, ज्यामुळे सामुद्रधुनीत तणाव निर्माण झाल्यासही त्यांच्या निर्यातीवर परिणाम होणार नाही. होर्मुझ सामुद्रधुनी हा एक महत्त्वाचा व्यापार मार्ग आहे, पण सौदी अरेबिया आणि UAE या मार्गाशिवायही तेल निर्यात करू शकतात. यामुळे भारताच्या दृष्टीने तेलाच्या किमतीवरील संभाव्य संकट आणि पुरवठा दोन्ही सध्या सुरक्षित असल्याचे स्पष्ट होते.