नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारतर्फे मनरेगा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पशु शेड बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जात आहे. या योजनेचा लाभ तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घेऊ शकता. या योजनेअंतर्गत तीन जनावरांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना 75 ते 80 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की मनरेगा पशु शेड योजने साठी अर्ज कसा करावा, शेतकऱ्यांची पात्रता काय आहे, आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान मिळू शकते. त्यामुळे संपूर्ण माहिती वाचून अर्ज प्रक्रियेला सुरुवात करा.
तीनपेक्षा अधिक जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी
- जे शेतकरी तीनपेक्षा जास्त जनावरे पाळतात त्यांना 1,16,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.
- आठपेक्षा जास्त जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 1,60,000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल.
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे:
1) आधार कार्ड
2) उत्पन्नाचे प्रमाणपत्र
3) पॅन कार्ड
4) जात प्रमाणपत्र
5) पत्त्याचा पुरावा
6) मनरेगा जॉब कार्ड
7) आधार कार्डशी लिंक केलेले बँक खाते
8) ईमेल आयडी
9) मोबाईल नंबर
10) पासपोर्ट आकाराचा फोटो
पात्रता अटी
- अर्जदार शेतकरी हा भारतीय नागरिक असावा.
- वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
- अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन असावी.
- अर्ज प्रक्रिया
शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नजीकच्या सेतू केंद्रावर जावे लागेल, जिथे तुम्ही अर्ज सादर करू शकता आणि केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊ शकता.
Pashu Shed Yojana 2024 अंतर्गत अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या आणि योजनेचा लाभ मिळवा.