मित्रानो संपूर्ण देशात आता परतीच्या पावसाचा हंगाम सुरू झालेला आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील काही भागांत पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज पासून राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल आणि पुढील तीन दिवसांत काय अपेक्षित आहे, याबाबतची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, कोकण, आणि जालना या भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी उष्णता जाणवत आहे, तर काही ठिकाणी नागरिकांना पावसामुळे त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्याचेही निदर्शनास आले आहे.
हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, जो 22 ऑक्टोबरपर्यंत राहू शकतो. तसेच, 23 ऑक्टोबरला मराठवाड्यात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. जरी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मान्सूनची पूर्णपणे एक्झिट होईल, तरी 5 नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यातील रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे, कारण सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांना पावसाचा मोठा फटका बसत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.