मित्रांनो केंद्र सरकारने पॅन कार्डला अधिक सुरक्षित आणि वापरण्यास सुलभ करण्यासाठी पॅन 2.0 प्रकल्प सुरू केला आहे. या नव्या पॅन कार्डमध्ये QR कोड समाविष्ट केला जाणार असून, डेटा सुरक्षा, QR कोड इंटिग्रेशन, आणि युनिफाईड पोर्टलसारख्या महत्त्वपूर्ण सुविधांमुळे करदात्यांचा अनुभव अधिक सुलभ व सुरक्षित होणार आहे.
सायबर फसवणुकीचा धोका
सायबर फसवणूक करणारे नव्या पॅन कार्ड प्रणालीला लक्ष्य करत आहेत. अनेक वेळा खोट्या ई-मेलद्वारे लोकांना फसवले जात आहे. या ई-मेलमध्ये प्राप्तिकर विभागाचा असल्याचा दावा करून तुम्हाला ई-पॅन डाउनलोड करण्यासाठी एक लिंक पाठवली जाते. पीआयबी फॅक्ट चेकने स्पष्ट केले आहे की हा ई-मेल पूर्णपणे फसवा आहे. या लिंकवर क्लिक केल्यास बँक खात्यातील पैसे चोरी जाण्याचा किंवा वैयक्तिक माहिती लीक होण्याचा धोका आहे.
सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या सूचना
1) प्राप्तिकर विभागाचा असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही ई-मेलला उत्तर देणे टाळा.
2) अशा ई-मेलसोबत आलेली कोणतीही अटॅचमेंट उघडू नका.
3) संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
4) संवेदनशील माहिती विचारणाऱ्या मेलला कधीही प्रतिसाद देऊ नका.
5) अशा फसव्या मेलचा अहवाल [email protected] या अधिकृत पत्त्यावर पाठवा.
पॅन 2.0: फसवणूक रोखण्याची क्षमता
पॅन 2.0 प्रकल्पाच्या माध्यमातून सायबर फसवणुकीस आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. QR कोडमुळे पॅन कार्डची पडताळणी सोपी होईल, आणि त्याची बनावट नक्कल करणे कठीण जाईल.
QR कोड स्कॅन करून व्हेरिफिकेशन
पॅन कार्डवरील QR कोड स्कॅन करून त्वरित पडताळणी करता येईल. यामुळे ओळख चोरी व छेडछाड टाळता येईल.
आधार कार्डशी जोडणी, रिअल-टाइम व्हॅलिडेशन, आणि अॅडव्हान्स डेटा अॅनालिटिक्ससारख्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सायबर सुरक्षेला अधिक बळकटी मिळेल.
नवा पॅन : संरक्षणासाठी प्रभावी की नाही?
नव्या सुविधांमुळे सायबर गुन्हेगारांना थोपवण्यात निश्चितच मदत होईल. तंत्रज्ञानाच्या सोबत योग्य जनजागृती आणि सावधगिरी हाच फसवणुकीपासून बचावाचा प्रमुख उपाय राहील.