नमस्कार मित्रानो सर्वांना स्वस्त आणि पोषक अन्न मिळावे यासाठी सरकारने रेशन वितरणाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानांवर रेशन उपलब्ध होते, ज्यामध्ये गहू, तांदूळ, डाळी, तेल आणि अन्य धान्यांचा समावेश असतो.
या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ४००० रुपये, पहा तुमचे नाव यादीत तर नाही ना
रेशन कार्ड अर्ज प्रक्रिया
सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी, नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. पात्र नागरिकांना कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता थेट त्यांच्या पत्त्यावर रेशन कार्ड मिळते. आता पाहूया की मोबाईलच्या साहाय्याने घरबसल्या नवीन रेशन कार्ड कसे काढावे:
या योजनेअंतर्गत सर्वांना मिळेल रु.2 लाख पर्यंत लाभ , जाणून घ्या हि योजना
रेशन कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
1) सर्वप्रथम, https://roms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर जा.
2) या पानावर साइन इन किंवा नवीन नोंदणी करायची आहे. यासाठी पब्लिक लॉगिन वर क्लिक करा.
3) न्यू यूजर साइन अप हियर या पर्यायावर क्लिक करा.
4) नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आय वांट टू अप्लाय न्यू रेशन कार्ड या पर्यायावर क्लिक करा.
5) अर्ज भरताना आपले नाव, आधार क्रमांक, लॉगिन आयडी, पासवर्ड, लिंग, मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता, आणि इतर आवश्यक माहिती अचूक भरा.
6) दिलेला कॅप्चा कोड भरून, गेट ओटीपी वर क्लिक करा.
7) प्राप्त झालेला ओटीपी टाकून, सबमिट करा.
8) प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपले खाते राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या संकेतस्थळावर तयार होईल.
9) एकदा खाते तयार झाल्यावर पुन्हा लॉगिन करा. रजिस्टर्ड युजर वर क्लिक करून आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
10) लॉगिन केल्यानंतर अप्लिकेशन रिक्वेस्ट मध्ये अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड हा पर्याय निवडा. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
आवश्यक कागदपत्रे
नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असते:
ओळखपत्र – पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट इ.
रहिवासी पुरावा – विजेचे बिल, टेलिफोन बिल, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट इ.,कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र,स्वघोषणापत्र,चौकशी अहवाल
खुशखबर ! सप्टेंबर मध्ये अर्ज केलेल्या महिलांना या दिवशी मिळणार 4500 रुपये, पहा यादीत नाव
वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुम्हाला पात्र असल्यास तुमचे रेशन कार्ड घरपोच मिळेल.