मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक राज्य, एक नोंदणी संकल्पनेची घोषणा केली आहे, ज्यामुळे नागरिकांना घरबसल्या दस्त नोंदणी करण्याची सुविधा मिळणार आहे. या संकल्पनेचा उद्देश म्हणजे राज्यभरातील कोणत्याही निबंधक कार्यालयातून दस्त नोंदणी करणे शक्य होईल. यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि कार्यपद्धती पारदर्शक होईल.
सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक विभागासाठी एक दुय्यम निबंधक कार्यालय निश्चित केले आहे, ज्यात घरांची खरेदी-विक्री, भाडे करार यासारख्या दस्तांची नोंदणी केली जाते. खास करून शहरी भागात, या कार्यालयात मोठी गर्दी दिसून येते आणि नागरिकांना खूप वेळ ताटकळत बसावे लागते. तसेच लाचखोरीसुद्धा एक मोठा समस्या आहे. या सर्व समस्यांना आळा घालण्यासाठी ‘एक राज्य, एक नोंदणी’ संकल्पना लागू केली जात आहे, ज्यामुळे भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यात मदत होईल.
तसेच, नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येईल, ज्यामुळे नागरिकांना घरबसल्या महसूल विषयक दस्त नोंदणीची सुविधा मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
याशिवाय, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील जमीन मोजणीसाठी जीआयएस तंत्रज्ञानावर आधारित ई-मोजणी सुरू करण्याची घोषणा केली आहे. याच्या माध्यमातून भूमी अभिलेख विभागाच्या सर्व सेवांची उपलब्धता नागरिकांना होईल. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ५० कार्यालयांमध्ये भू प्रमाप्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
राज्याच्या ग्रामीण भागातील वडिलोपार्जित जमिनीवरील लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामिता योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, गावठाण भूमापन आणि जीआयएस सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे, ज्यामुळे स्थानिक लोकांना त्यांच्या जमिनीचे स्वामित्व किंवा मालमत्ता कार्ड मिळवण्याची सुविधा मिळेल.