Old Pension Scheme मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन योजना सुरू व्हावी यासाठी विविध मोर्चे तसेच आंदोलन करण्यात आले आहेत आणि आता राज्य शासनाकडून राज्यातील काही नागरिकांना जुनी पेन्शन योजना देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातील अधिकृत जीआर 16 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला.
केंद्र शासनाकडून 22 डिसेंबर 2003 पूर्वी भरतीची जाहिरात किंवा अधिसूचना निघालेल्या आणि 1 जानेवारी 2004 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आणि प्रत्यक्ष नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 नंतर झाली अशा कर्मचाऱ्यांसाठी हा जीआर आहे.
SBI खातेदारांना मिळणार 11 हजार रुपये, लवकर हा फॉर्म भरा
जलसंपदा विभाग अंतर्गत हा जीआर काढण्यात आलेला आहे आणि अधीक्षक अभियंता या पदावर कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर कर्मचाऱ्यांकडून शासनाला अर्ज पाठवण्यात आलेला होता आणि त्यावरती शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला आहे.
सदर अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्राच्या सरळ सेवा भरती अंतर्गत करण्यात आली होती आणि त्यासाठीची परीक्षा 5 फेब्रुवारी 2005 तसेच 6 फेब्रुवारी 2005 रोजी घेण्यात आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानुसार ही परीक्षा घेण्यात आलेली होती.
शासन निर्णय पहा
शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णय मध्ये सदर कर्मचाऱ्यांची नावे तसेच त्यांचा हुद्दा नमूद करण्यात आलेला आहे. राज्यातील एकूण नऊ कर्मचाऱ्यांना याचा लाभ प्राप्त झालेला आहे. या कर्मचाऱ्यांनी त्यांचे नवीन भविष्य निर्वाह खाते उघडावे तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली मधील खाते बंद करावे अशी माहिती शासन निर्णयात देण्यात आलेली आहे.