मंडळी राज्यातील १३ तालुक्यांतील ५३ मंडळांमध्ये २१ दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. यामुळे झालेल्या नुकसानीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई जाहीर करण्यात आली आहे.
नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात
शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यासाठी विमा भरपाईच्या २५% रक्कम आगाऊ दिली जाणार आहे. उशिरा झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात पेरण्या थांबल्या होत्या, तसेच मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि धान या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
या जिल्ह्यांना नुकसानभरपाई मिळणार
1) अकोला
2) अहमदनगर
3) अमरावती
4) छत्रपती संभाजीनगर
5) बुलढाणा
6) जळगाव
7) जालना
8) नाशिक
9) परभणी
10) पुणे
11) सांगली
12) सातारा
13) सोलापूर
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
- राज्य सरकारने यावर्षी फक्त १० रुपयांत पीक विमा योजना उपलब्ध करून दिली आहे.
- कृषी विभागाने तातडीने सर्वेक्षणाचे आदेश दिले असून अहवाल पूर्ण होताच भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून अनियमित पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई यादीत आपले नाव आहे का, याची खातरजमा करून घ्यावी. अधिक माहितीसाठी संबंधित कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.