नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी एक नवीन मदत यादी जाहीर केली आहे. या यादीत विविध जिल्ह्यांमध्ये मदत दिली जाईल, आणि शासनाने जुलै 2024 मध्ये जशा पिक नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली होती, तशीच प्रक्रिया ही सप्टेंबर व ऑक्टोबर 2024 साठी केली जाईल.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, मका आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामेही पूर्ण झाले असून, आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात संबंधित नुकसानभरपाई जमा केली जाईल.
अतिवृष्टी मदतीचे वाढीव दर
1) जिरायत पिकांचे नुकसान
- पूर्वी — ₹6,800 प्रति हेक्टर (2 हेक्टर मर्यादा)
- नवीन— ₹13,600 प्रति हेक्टर (3 हेक्टर मर्यादा)
2) बागायत पिकांचे नुकसान
- पूर्वी— ₹13,500 प्रति हेक्टर (2 हेक्टर मर्यादा)
- नवीन—₹27,000 प्रति हेक्टर (3 हेक्टर मर्यादा)
3) बहुवार्षिक पिकांचे नुकसान
- पूर्वी— ₹18,000 प्रति हेक्टर (2 हेक्टर मर्यादा)
- नवीन— ₹36,000 प्रति हेक्टर (3 हेक्टर मर्यादा)
सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या नुकसानासाठी
राज्यातील शेती पिकांच्या आणि शेत जमिनीच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीमधून एकूण ₹128,674.66 लाख रुपये मदत म्हणून वितरित केली जाणार आहे. हे निधी विभागीय आयुक्त पुणे आणि औरंगाबाद यांच्यामार्फत वितरण केले जाईल.
जिआर पहा
https://drive.google.com/file/d/1JxYZZ_xemHv0Uq6UH6YYjqD67qQIeDy_/view?usp=drivesdk