नमस्कार मित्रांनो राज्यातील अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आता मदतीचा हात मिळणार आहे. राज्य सरकारने नुकताच निर्णय घेतला आहे की, तीन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना विविध प्रकारे नुकसानभरपाई दिली जाईल. जीरायती पिकांसाठी हेक्टरी १३,६०० रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७,००० रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६,००० रुपये नुकसानभरपाई दिली जाईल.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेती व फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचा आढावा घेत राज्य सरकारने नोव्हेंबरमध्ये मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या रोषामुळे आणि रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यामुळे सरकारने तातडीने त्यांना ३ हेक्टरपर्यंत मदत देण्याचे निर्देश दिले.
पूर्वी शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळत होती, परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही मर्यादा ३ हेक्टरपर्यंत वाढवण्यात आली. यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता लवकरच हि मदत मिळणार आहे, ज्यामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.