NPS Vatsalya Scheme देशातील तरुणांचे भविष्य सुरक्षित रहावे आणि त्यांना भविष्यात आर्थिक निधी प्राप्त व्हावा यासाठी 2024 मधील अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एनपीएस वात्सल्य योजना या योजनेची घोषणा केली आणि आता 18 सप्टेंबर 2024 पासून ही योजना संपूर्ण देशभरामध्ये लागू केली जाणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून योजनेची सुरुवात केली जाणार आहे.
एनपीएस वात्सल्य योजना मुलांसाठी विशेष पेन्शन योजना आहे आणि ही योजना पेन्शन फंड रेगुलट्री अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी च्या माध्यमातून कार्यरत असणार आहे. पालक मुलांसाठी या योजनेचा उपयोग करू शकतील यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन पोर्टल सुरू केले जाणार आहे.
खुशखबर ! सप्टेंबर मध्ये अर्ज केलेल्या महिलांना या दिवशी मिळणार 4500 रुपये, पहा यादीत नाव
अठरा वर्षे वयोगटापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांसाठी ही योजना काम करेल आणि त्यामध्ये पालक आपल्या सोयीनुसार पैसे गुंतवणूक करू शकतील. या योजनेमध्ये कमीत कमी हजार रुपये गुंतवणूक केली जाऊ शकते तसेच जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यावर कोणतेही मर्यादा नाही.
योजनेमध्ये भाग घेणाऱ्या मुलांसाठी परमनंट अकाउंट रिटायरमेंट नंबर दिला जाईल. मुलांच्या आर्थिक भविष्य बळकट करण्यासाठी आणि भविष्याच्या सुरक्षिततेसाठी शासनाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे. मुल अठरा वर्षांचे पूर्ण होईपर्यंत पालकांना ही रक्कम मुलाच्या खात्यामध्ये दरवर्षी जमा करावी लागेल.
खुशखबर ! या सरकारी कर्मचार्यांना लागू होणार जुनी पेन्शन , शासन निर्णय जाहीर
मोदी सरकारच्या नवीन टर्म मधील पहिल्या अर्थसंकल्पामध्ये ही नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि यामुळे देशभरातील मुलांना याचा फायदा होणार आहे. देशभरातील सर्व नागरिक या योजनेमध्ये पात्र असतील आणि आपल्या मुलांसाठी या योजनेमध्ये भाग घेऊ शकतील.