नमस्कार मित्रांनो राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. 5 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याचे वितरण होणार आहे. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण देखील याच दिवशी होण्याची शक्यता आहे. यासाठी राज्य शासनाने 2,200 कोटी 54 लाख 96 हजार रुपये निधीस मंजुरी दिली आहे.
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे हप्त्यांचे वितरण
5 ऑक्टोबर रोजी, वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याचे वितरण होणार आहे. याच कार्यक्रमात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.