मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना वार्षिक १८००० रुपये मिळणार आहे. तर आता निवडणूक जवळ येत असून खूप योजनाची अंमलबजावणी सुरु आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी अंबलबजावणी नंतर आता वयोश्री योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुख्यमंत्री वयोश्री योजनेला उदंड प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत २० हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज केले आहेत. या योजनेंतर्गत ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एक वेळ एक रकमी ३ हजार रुपये मिळणार आहेत. अशी माहिती समाजकल्याण विभागाचे अधिकारी संजय बागुल यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा : या महिलांना मिळेल वर्षाला मोफत तीन गॅस सिलेंडर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या वयोश्री योजनेला गती मिळत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून करण्यात आले होते. या योजनेला ज्येष्ठ नागरिकांनीही चांगला योजनेचे स्वरुप प्रतिसाद देत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून २० हजार अर्ज दाखल केले आहेत.
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेला गती देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घुगे यांनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरीता महत्वाच्या सूचना केल्या.
लाडकी बहीण योजनेचे रु.४५०० या दिवशी जमा होणार, पहा कोणती तारीख आहे
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामीण स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे आरोग्य शिबीराचे आयोजन करावे, शिबीरामध्ये आशा स्वयंसेविका यांच्या सहायाने ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांचे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे विहित नमुण्यातील अर्ज भरुन घ्यावेत अशा सूचना ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या.
चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर आदी सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येणार आहेत. मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी योगोपचार आदीचा लाभ घेता येईल. यासाठी पात्र लाभार्थ्यांना एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये लाभ देण्यात येणार आहे.
काय आहेत योजनेसाठी अटी
- लाभार्थ्यांचे वय दि. ३१ डिसेंबर २०२३ अखेर ६५ वर्षे पूर्ण असावे.
- त्या व्यक्तीकडे आधारकार्ड असणे आवश्यक.
- लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयाच्या आत असावे.
अर्ज असा करावा
सरकारी वेबसाईट वर जाऊन किंवा जिल्हा परिषद मधून अर्ज करता येतात.